वाई तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचा 'ग्रीन पॅटर्न'; सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ३५०० वृक्ष लागवडीचा शानदार शुभारंभ!

Published:Jun 30, 2026 05:21 PM | Updated:Jun 30, 2026 05:21 PM
News By : ATUL SAPKAL
वाई तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचा 'ग्रीन पॅटर्न'; सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ३५०० वृक्ष लागवडीचा शानदार शुभारंभ!

वाई तालुक्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चालू वर्षात विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३,५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा नुकताच शानदार शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. राहुल अहिरे आणि वाई उपविभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे.