किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना
Published:3 m 1 d 12 hrs 20 min 47 sec ago | Updated:3 m 1 d 12 hrs 13 min 41 sec ago
News By : Satara
किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी   बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी अंगरक्षक, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले प्रतापगडावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे