कराड, दि. 14 ः अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्यासह त्यांना लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या ओगलेवाडी येथील एस के रॉयल पॅलेज लॉज मालकास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
अशुतोष चंद्रकांत कुंभार (वय 21, रा. कालगाव, ता. कराड) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. तर शमशुदीन रसुल नदाफ (वय 62 रा. शनिवार पेठ, कराड) असे लॉजमालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील आठ दिवसापूव कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेलेबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सदर गुन्ह्याचा खोल तपास करीत सीडीआरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे अल्पवयीन मुलीस सातारा येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिला अुशतोष कुंभार याने फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक केली. तसेच पिडीत मुलीस लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी रूम उपलब्ध करून देणारा ओगलेवाडी येथील लॉज एस के रॉयल पॅलेसचा मालक शमशुद्दीन नदाफ याला सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांचे पथकाने केली.