सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश
सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Published:Mar 23, 2026 11:06 AM | Updated:Mar 23, 2026 11:06 AM
News By : Muktagiri Web Team
विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सवाल उपस्थित केला की आम्ही सुरक्षित आहोत की नाही? सभागृहात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरल्यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे निर्देश दिले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर एसपींच्या निलंबनाच्या मागणीसाठी निदर्शने देखील केली.