कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

शासनाने कलाकारांना मानधन देण्याची मागणी
Published:5 y 4 m 7 hrs 8 min 17 sec ago | Updated:5 y 4 m 7 hrs 8 min 17 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.