जिल्हा रूग्णालयातून मृत महिलेच्या दागिन्यांची चोरी 

नातेवाईकांकडून संताप ; चौकशी समिती नेमली
Published:Feb 13, 2021 02:59 PM | Updated:Feb 13, 2021 02:59 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्हा रूग्णालयातून मृत महिलेच्या दागिन्यांची चोरी 

जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.