वीर धरण 97.48 टक्के भरले

बुधवारी संध्याकाळपासून दोन हजार पन्नास क्युसेक वेगाने विसर्ग
Published:Aug 12, 2020 04:35 PM | Updated:Aug 12, 2020 04:35 PM
News By : Muktagiri Web Team
वीर धरण 97.48 टक्के भरले

सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणार्‍या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण भरण्याच्या मार्गावर असून बुधवारी संध्याकाळी चार वाजता वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलुन एक हजार 200 क्युसेस तर विद्युत गृहातूनही आठशे क्युसेक्स पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.