नागरिकांची लॉकडाऊन काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी 

दीपाली गोडसे यांची मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
Published:Aug 14, 2020 12:30 PM | Updated:Aug 14, 2020 12:30 PM
News By : Muktagiri Web Team
नागरिकांची लॉकडाऊन काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी 

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातल्या नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.