फलटणमध्ये कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

फलटण शहर पोलिसांची कारवाई : 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त
Published:5 y 4 m 1 hrs 24 min 24 sec ago | Updated:5 y 4 m 1 hrs 24 min 24 sec ago
News By : Muktagiri Web Team
फलटणमध्ये कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.