4 ऑक्टोबरला प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलन
News By : Satara
सातारा ; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा व स्वागत समिती यांचे मार्फत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलन चे आयोजन रविवार चार आक्टोबर केले आहे .हे संमेलन दैवज्ञ सांस्कृतिक हॉल ,फुटका तलाव ते समर्थ मंदिर रस्ता समर्थ मंदिर चौक येथे संपन्न होणार आहे .या संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक संजय आवटे उपस्थित राहणार आहेत तर संमेलनाचे उद्घाटन मानसोपचार तज्ञ डॉक्टर अनिमिष चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश पोळ उपस्थित राहणार आहेत.याचे सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी करणार आहेत .उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे.
संमेलनाचा समारोपाला ज्येष्ठ अभिनेते किरण माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि साहित्यिक एडवोकेट शंकर निकम यांची प्रमुख उपस्थिती समारोपाला लाभणार आहे.याचे सूत्रसंचालन सुनिता कदम करणार आहेत .समारोप संध्याकाळी चार वाजता होणार आहे.
या संमेलनात दुपारी बारा वाजता
' मराठी मालिका मधून साहित्य मूल्य
उणावते आहे का ? 'हा परिसंवाद होणार आहे या परिसंवादाला वक्ते म्हणून
ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे ,लेखक निलेश , एडवोकेट सीमंतिनी नुलकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक मानसिंग पवार उपस्थित राहणार आहेत.याचे सूत्रसंचालन कविता प्रभुणे करणार आहेत.
दुपारी
अडीच वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे. याचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व लेखक प्रदीप कांबळे असणार आहेत .या निमंत्रितांच्या कवी संमेलनात
वसंत शिंदे ,अश्विनी कोठावळे , कांता भोसले ,नरेंद्र निकम, डॉक्टर शुभांगी कुंभार, मनीषा शिरटावले ,नंदकुमार शेडगे, डॉ शैलजा माने प्रा युवराज खरात ,सुरेखा कुलकर्णी, वसुंधरा निकम, विजय कदम ,अंजली गोडसे, एडवोकेट संगीता केंजळे ,रंजना सानप, आर डी पाटील , विशाल घाडगे आणि रमाकांत देशपांडे हे कवी उपस्थित राहणार आहेत.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत.
अशी माहिती ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती व अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी दिली.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सर्व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्राध्यापक श्रीधर साळुंखे अध्यक्ष डी डी थोरात ,कार्यवाह वैदेही कुलकर्णी व सर्व स्वागत समिती सदस्य आणि ग्रंथालयाचे संचालक मंडळ यांनी केली आहे.


