भ्रष्टाचाऱ्यासाठी हुतात्माभूमी ठरतेय चराऊ कुराण

Published:1 hrs 13 min 31 sec ago | Updated:1 hrs 13 min 31 sec ago
News By : Muktagiri Web Team
भ्रष्टाचाऱ्यासाठी हुतात्माभूमी ठरतेय चराऊ कुराण

काही वर्षापूर्वी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व अन्य काही भ्रष्टाचार निर्मुलन समित्या कार्यरत होत्या. मात्र अलिकडच्या काळात त्यांचे काम थंडावले असल्याची चर्चा आहे. तर एक-दोन संघटना सोडल्या तर आंदोलन हा विषय संपल्यात जमा असल्याचे चित्र आहे. तसेच निवडणूकी पुरते जागे होणारे विरोधी पक्षाचे नेते दैनंदिन विषयात चिडीचुप असल्याने भ्रष्ट अधिकार्‍यांना सगळीकडे रान मोकळे झाले आहे.