कराडच्या उड्डाणपुलावर महिला पोलिसाचा वाढदिवसाचा झगमगाट!

नव्या कारसमोर केक, फुलांचा बुके अन्‌‍ ‌‘पायरों गन‌’चा थाट; रील व्हायरल झाल्याने कराडमध्ये चर्चेला उधाण, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष
Published:Nov 01, 2026 10:29 PM | Updated:Nov 01, 2026 10:29 PM
News By : Muktagiri Web Team
कराडच्या उड्डाणपुलावर महिला पोलिसाचा वाढदिवसाचा झगमगाट!

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष! महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची रील व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक रस्त्यावरील अशा प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून नियमभंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाते; मग संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या या प्रकाराची वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? तिच्यावर कारवाई हो