सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची

रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रतिपादन; फलटण पंचायत समितीच्या आवारात एटीएमचे उद्घाटन
Published:5 y 7 m 22 hrs 27 min 4 sec ago | Updated:5 y 7 m 22 hrs 27 min 4 sec ago
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची

‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या हिताचे नेहमीच प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.