कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोडोली येथील भैरवनाथची यात्रा रद्द

नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांची माहिती * पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासमवेत गावकर्‍यांची बैठक
Published:Apr 15, 2021 09:50 AM | Updated:Apr 15, 2021 10:00 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोडोली येथील भैरवनाथची यात्रा रद्द

गोडोली गावाची यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यंदा गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला. गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी ही माहिती दिली.