‘मोक्का’ लावलेल्या मदने टोळीतील मोस्ट वाँटेड किरण मदने जेरबंद

ताथवडे घाटात एलसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले
Published:Apr 25, 2021 01:17 PM | Updated:Apr 25, 2021 01:17 PM
News By : Muktagiri Web Team
‘मोक्का’ लावलेल्या मदने टोळीतील मोस्ट वाँटेड किरण मदने जेरबंद

सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्‍या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. किरण मदने असे त्याचे नाव आहे.