कोरेगावात फुटवेअर दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

Published:5 y 4 m 19 hrs 51 min 27 sec ago | Updated:5 y 4 m 19 hrs 51 min 27 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरेगावात फुटवेअर दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.