ड्रेनेज साफ करताना दोन कर्मचारी बेशुद्ध
कराड येथील वाखाण परिसरात दुर्घटना
Published:3 y 11 m 1 d 40 min 12 sec ago | Updated:3 y 11 m 1 d 19 min 43 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : ड्रेनेज साफ करताना दोन कर्मचारी बेशुद्ध झाल्याची घटना आज दुपारी घडली. कराडच्या वाखाण परिसरात ही घटना घडली असून मदत कार्यासाठी अग्निशामक दलासह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे.
अनिरुद्ध लाड व अमोल चंदनशिवे अशी बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी कराड पालिकेचे आरोग्य कर्मचारी अनिरुद्ध लाड, अमोल चंदनशिवे, प्रविण चव्हाण, जयवंत लाड हे ड्रेनेच्या साफसफाई काम करण्यासाठी वाखाण परिसरात गेले होते. यावेळी ड्रेनेजचे काम करत असताना अचानकपणे अनिरुद्ध लाड व अमोल चंदनशिवे हे बेशुद्ध झाले. याबाबतची माहिती घटनास्थळावरील अन्य कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या नंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतीसाठी ॲम्बुलन्स रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचे पथक ही दाखल झाले. बेशुद्ध झालेल्या दोघांनाही उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.