आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून 80 बेडचे कोव्हीड केअर सेंटर 

बुधवारी करणार जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द; 80 पैकी 40 बेड ऑक्सिजन पुरवठ्यासह
Published:Sep 05, 2020 08:43 AM | Updated:Sep 05, 2020 08:47 AM
News By : Muktagiri Web Team
आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून 80 बेडचे कोव्हीड केअर सेंटर 

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबियांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये 40 बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत 40 बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत.