पुसेगाव येथे गणेश मूर्तींच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात

Published:Aug 11, 2020 09:06 AM | Updated:Aug 11, 2020 09:06 AM
News By : Muktagiri Web Team
पुसेगाव येथे गणेश मूर्तींच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात

गणेशोत्सव म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता उत्सव. पण कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर विरजण पडल्याचे चित्र दिसत आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की, बाप्पांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावता येतील की नाही याची खात्री देखील व्यावसायिकांना नाही. यामुळे पुसेगाव, ता. खटाव येथील गेली अनेकवर्ष सिझनल व्यवसाय करणार्‍या काही गणेशमूर्ती विक्रेत्यांनी हताश न होता बाप्पांच्या मूर्तीची ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.