बंगळुरूमध्ये आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे हिंसा : पोलिसांच्या गोळीबारात 2 ठार, 60 पोलीस जखमी
पोलीस ठाण्याच्या 2 भागात कर्फ्यू, आरोपींसह 110 हून अधिक जणांना अटक
News By : Muktagiri Web Team
आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून मंगळवारी रात्री बेंगळुरूमध्ये हिंसाचार उफाळला. पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 60 हून अधिक पोलीस जखमी झाले. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.


