आणखी 290 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 290 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये जावली तालुक्यातील 4, कराड 82, खंडाळा 29, खटाव 13, कोरेगाव 35, महाबळेश्वर 11, माण 1, पाटण 13, फलटण 16, सातारा 41, वाई तालुक्यातील 45 अशा एकूण 290 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
892 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 124, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 80, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 57, कोरेगाव 47, वाई 69, खंडाळा 92, रायगाव 23, मायणी 49, महाबळेश्वर 24, पानमळेवाडी 88, पाटण 22, दहिवडी 40, खावली येथील 157 अशा एकूण 892 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.