अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांना पोलिसांचा दणका

वडूज पोलिसांची कारवाई; 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
Published:Aug 13, 2020 09:04 AM | Updated:Aug 13, 2020 09:04 AM
News By : Muktagiri Web Team
अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांना पोलिसांचा दणका

भुरकवडी-सिद्धेश्‍वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी सुशांत हणमंत कदम, विशाल कदम (दोन्ही रा. भुरकवडी), सचिन जाधव उर्फ टमाट्या (रा. वडूज)  व वगैरे चार जणांवर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.