‘राजेंद्र माने फाउंडेशन’ची दातृत्वाची भावना कौतुकास्पद 

आ. मकरंद पाटील यांचे प्रतिपादन; फाउंडशनकडून महाबळेश्‍वर तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रात मास्कचे वाटप
Published:Aug 10, 2020 03:26 PM | Updated:Aug 10, 2020 03:26 PM
News By : Muktagiri Web Team
‘राजेंद्र माने फाउंडेशन’ची दातृत्वाची भावना कौतुकास्पद 

‘कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राजेंद्र माने फाउंडेशनतर्फे सर्वसामान्य नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यासाठी 1500 मास्क देऊन आपली दातृत्वाची भावना सिद्ध केली आहे. आगामी काळात त्यांनी येथील भूमिपुत्रांना स्पर्धा परीक्षांचं ज्ञान देण्यासाठी पुढे यावे,’ असे प्रतिपादन महाबळेश्‍वर-वाई-खंडाळा मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांनी केले.