उरमोडीचे दरवाजे उघडले; वक्र दरवाजातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Published:Aug 14, 2020 11:38 AM | Updated:Aug 14, 2020 11:38 AM
News By : Muktagiri Web Team
उरमोडीचे दरवाजे उघडले; वक्र दरवाजातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.