कोरेगाव तालुका शिक्षक समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम संघटनेला दिशा देणारा 

किरण यादव यांचे गौरवोद्गार; दहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार 
Published:6 y 1 hrs 42 min 41 sec ago | Updated:6 y 1 hrs 42 min 41 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरेगाव तालुका शिक्षक समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम संघटनेला दिशा देणारा 

‘नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लागले. या निकालात कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पाल्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा घरी जाऊन पेढे देऊन नुकताच कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा व संघटनेला नवी दिशा देणारा आहे,’ असे गौरवोद्गार शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांनी व्यक्त केले.