पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद

धरणात 91.63 टीएमसी पाणीसाठा
Published:Aug 20, 2020 08:08 AM | Updated:Aug 20, 2020 08:08 AM
News By : Muktagiri Web Team
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.