सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार : पालकमंत्री जयंत पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
Published:Aug 15, 2020 12:28 PM | Updated:Aug 15, 2020 12:31 PM
News By : Muktagiri Web Team
सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार : पालकमंत्री जयंत पाटील

कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल.