दरे येथील निर्घुण प्रकरणातील मुख्य संशयीत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई 
Published:Aug 21, 2020 11:10 AM | Updated:Aug 21, 2020 11:11 AM
News By : Muktagiri Web Team
 दरे येथील निर्घुण प्रकरणातील मुख्य संशयीत जेरबंद

कोरेगाव तालुक्यातील दरे गावच्या हद्दीत माळरानावरील पारधी वस्तीवर विजय सावता काळे यांचा नऊ जणांनी निर्घुण खुन केला होता. यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, मुख्य सुत्रधारासह इतर संशयीत पसार झाले होते. दि. 20 रोजी आसगाव, ता. सातारा येथील टेकडीवर एलसीबीच्या पथकाने मुख्य संशयीताचा थरारक पाठलाग करून त्यास जेरबंद केले.