कातरखटावमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण 

प्रशासनाकडून बाधित परिसर सील; आजपासून चार दिवस कडक लॉकडाऊन
Published:5 y 7 m 20 hrs 35 min 30 sec ago | Updated:5 y 7 m 20 hrs 35 min 30 sec ago
News By : Muktagiri Web Team
कातरखटावमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण 

गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या  एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना कमिटीने घेतला आहे.