बिबट्याने पाच वर्षाच्या मुलाला आईसमोरून उचलून नेले
कराड तालुक्यातील येणकेतील घटना ः मुलाचा मृत्यू
Published:4 y 9 m 6 hrs 10 min 48 sec ago | Updated:4 y 9 m 6 hrs 10 min 48 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड ः येणके ता. कराड येथे बिबट्याने पाच वर्षीय बालकास आईसमोरून उचलून नेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली असून नजीकच्या ऊसाच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येणके ता. कराड येथील ऊस तोड करण्यासाठी आलेल्या मजूराच्या मुलाला बिबट्याने त्याच्या आईसमोरून उचलून नेले. ही घटना सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली. यावेळी आईने आरडोओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. बिबट्याने नजीक ऊसाच्या शेतात मुलाला तोंडात उचलून नेले होते. लोकांनी ऊसाच्या शेतात शोध घेतला असता बिबट्याने हल्ल्यामुळे मुलागा रक्तबंबाळ झालेल्या स्थितीत आढळला. तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकार्यांसह पोलीस पथक दाखल झाले आहे.