मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित

एकूण रुग्णसंख्या 106 : मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण 
Published:5 y 7 m 19 hrs 20 min 17 sec ago | Updated:5 y 7 m 19 hrs 20 min 17 sec ago
News By : Muktagiri Web Team
मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित

कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्‍या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.