नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे रखडली

तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन छेडण्याचा लाभार्थ्यांचा इशारा
Published:5 y 5 m 7 hrs 19 min 27 sec ago | Updated:5 y 5 m 7 hrs 19 min 27 sec ago
News By : Muktagiri Web Team
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे रखडली

कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.